ऊर्जा मंत्रालय उद्या साजरा करणार “ऊर्जा संवर्धन दिन 2022”

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या कार्यक्रमाच्या  प्रमुख अतिथी असतील. राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार, राष्ट्रीय ऊर्जा कार्यक्षमता नवोन्मेष पुरस्कारांचे वितरण होणार असून राष्ट्रीय चित्रकला स्पर्धा पारितोषिक विजेत्यांना त्या सन्मानित करतील आणि तसेच यावेळी EV यात्रा पोर्टलचा प्रारंभ देखील करतील.

राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2022

ऊर्जा कार्यक्षमता आणि संवर्धन याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने ऊर्जा मंत्रालयाच्या अखत्यारीतील ऊर्जा कार्यक्षमता ब्युरोच्या वतीने  दरवर्षी 14 डिसेंबर रोजी  ऊर्जा संवर्धन दिनाचे औचित्य साधून ऊर्जेचा वापर कमी करून ऊर्जा बचत करणाऱ्या औद्योगिक एकके, संस्था आणि आस्थापना यांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते.

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here