मीरगंज : मीरगंज साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात आपल्याला ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना १६ डिसेंबरअखेरची बिले अदा केली आहेत. शेतकऱ्यांना उसाचे पैसे त्यांच्या बँक अकाऊंटमध्ये पाठले आहेत.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गुरुवारी साखर कारखान्याचे युनिट हेड आशिष शर्मा यांनी सांगितले की, मिरगंज साखर कारखान्याने ५२४.३० लाख रुपयांची ऊस बिले शेतकऱ्यांना दिली आहेत.
साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात आतापर्यंत ९२२९.९१ लाख रुपये ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिले आहेत. कारखान्याने २८ डिसेंबरअखेर ३४.३४ लाख क्विंटल ऊसाची खरेदी केली आहे. आगामी काळात कारखान्याला उत्पादक शेतकऱ्यांनी साफ आणि स्वच्छ ऊसाचा पुरवठा करावा असे आवाहन युनिट हेड शर्मा यांनी यावेळी केले.