उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून निसर्गाचे रौद्र रूप पाहायला मिळत आहे. हिमाचल प्रदेशपासून राजस्थानपर्यंत अनेक ठिकाणी पावसाने धुमाकूळ घातला आहे. उत्तराखंडमध्ये हाहाकार माजला आहे.
उत्तर भारतात अनेक ठिकाणी स्थिती गंभीर आहे. दुसरीकडे देशाच्या काही भागात लोक पावसाची प्रतीक्षा करीत आहेत. पुर्वोत्तर भारतात अपेक्षेपेक्षा खूप कमी पाऊस पडला आहे.
टीव्ही ९ हिंदीमधील वृत्तानुसार नऊ आणि दहा जुलै रोजी हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, दिल्ली, हरियाणा, राजस्थान, पश्चिमी उत्तर प्रदेशात पावसाने हाहाकार माजवला. डोंगराळ भागातील नद्यांनी रौद्ररुप धारण केले जाते. त्यामुळे काही ठिकाणी याला राष्ट्रीय आपत्ती जाहीर करावी लागली. दिल्ली, चंदीगढ, अंबालासह अनेक मोठ्या शहरांमध्ये रस्त्यांची तळी बनली. या काळात हिमाचल प्रदेश, पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान, गुजरातमध्ये सामान्य पेक्षा जास्त पाऊस कोसळला आहे.