विधानसभेत आमदारांनी मांडला थकीत ऊस बिलांचा प्रश्न

सहारनपूर : लखनौमध्ये सुरू असलेल्या विधानसभेच्या अधिवेशनात रामपूर मनीहारान मतदारसंघाचे भाजपचे आमदार देवेंद्र निम यांनी विभागातील शेतकऱ्यांच्या ऊस थकबाकीचा मुद्दा उपस्थित केला. याशिवाय त्यांनी हिंडन नदीत कारखान्यांकडून सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त पाण्याचाही प्रश्न उपस्थित केला.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आमदारांनी आपले प्रश्न उपस्थित करताना सांगितले की, रामपूर मनीहारान विभागातून वाहणाऱ्या हिंडन नदीत सहारनपूरमधील कारखान्यांच्या वतीने सोडण्यात येणाऱ्या रसायनयुक्त पाण्यामुळे ग्रामस्थांना गंभीर आजारांना तोंड द्यावे लागत आहे. नदीत सोडले जाणारे रसायनयुक्त पाणी थांबवावे. हिंडन नदीकाठच्या साढोली हरिया, टपरी, कुराली गावातील शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी अनेक किलोमीटर लांब अंतरावरून जावे लागते. त्यामुळे पुलाची उभारणी गरजेची आहे. गंगनौली साखर कारखान्याने ऊस बिले थकवली आहेत. ती तातडीने दिली जावीत अशी मागणी आमदार देवेंद्र निम यांनी यावेळी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here