विधानसभेत आमदारांनी मांडला वाल्टरगंज साखर कारखान्याचा प्रश्न

बस्ती : विधानसभेच्या अधिवेशनात जिल्ह्यातील समाजवादी पक्षाचे आमदार महेंद्र यादव यांनी वाल्टरगंज साखर कारखान्याकडून शेतकरी, कामगारांची थकबाकी असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. इंजिनीअरिंग कॉलेजची गुणवत्ता तपासणी करावी अशी मागणीही त्यांनी केली. तर रुधौलीच्या आमदारांनी वीज आणि सरकारच्या स्कूल चलो अभियानाविषयी यावेळी टीका केली.

दैनिक अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, विधानसभेचे अधिवेशनाचे सत्र सुरू झाल्यावर आमदार महेंद्र यादव यांनी विविध मुद्दे मांडले. ते म्हणाले की, वाल्टरगंज साखर कारखान्याकडे शेतकऱ्यांचे ५८ कोटी रुपये आणि कामगारांचे १७ कोटी रुपये थकीत आहेत. मात्र, यासाठी अर्थसंकल्पात काहीच तरतुद करण्यात आलेली नाही. आमदार यादव यांनी वाल्टरगंज साखर कारखाना चालविण्याची मागणी पटलावर ठेवली. दुसरीकडे रुधौलीचे आमदार राजेंद्र यांनी स्कूल चलो अभियानाच्या मुलांच्या मध्यान्ह भोजन योजनेला निधी कमी केल्याने जेवणाची गुणवत्ता घसरल्याबद्दल प्रश्न उपस्थित केले. महेंद्र यादव यांनी जिल्ह्यातील मुलभूत समस्यांबाबत प्रश्न मांडणार असल्याचे सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here