साखर कारखाना सुरू करण्याबाबत आमदारांनी घेतला आढावा

जसपूर, उत्तराखंड: नादेही साखर कारखाना वेळेत सुरु करण्याबाबत आमदारांनी कारखाना अधिकार्‍यांसह बैठक घेतली. त्यांनी नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कारखान्यात गाळप हंगाम सुरु करण्याबाबत सांगितले. मंगळवारी आमदार आदेश चौहान यांनी नादेही कारखान्याचे प्रमुख व्यवस्थापक सीएस इमलाल, डिप्टी चीफ इंजिनीअर सीबी सिंह, चीफ कैमिस्ट अजय कुमार तसेच इतर कर्मचार्‍यांसह आढावा बैठक़ घेतली. आमदारांनी सध्या कारखान्याच्या स्थितीबाबत माहिती घेतली. तसेच ऊसाच्या क्षेत्रफळाबाबत माहिती घेतली. आमदारांनी कारखाना अधिकार्‍यांना लवकरच कारखाना सुरु करण्याबाबत सांगितले. जीएम इमलाल यांनी आमदारांना सागितले की, यावेळीही ऊसाचे उत्पादन वाढले आहे. लक्ष्यापेक्षा अधिक गाळप केले जाईल. त्यांनी सांगितले की, कारखान्यामध्ये दुरुस्तीचे काम सुरु केले जात आहे. या महिन्याअखेर पर्यंत दुरुस्ती केली जाईल. आमदारांनी सर्व कामे पूर्ण जबाबदारीने करण्याबाबत सांगितले. यावेळी चंद्रशेखर, प्रधान खेम सिंह, सुभाष सिंह, हरिश्‍चंद्र, राजेंद्र सिंह आदी उपस्थित होते.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here