जसपूर : आमदार आदेश चौहान यांनी नादेही साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेवून गळीत हंगामासाठीच्या तयारीचा आढावा घेतला. ऑक्टोबरपर्यंत कारखान्यातील मशीनरी दुरुस्तीचे काम पूर्ण करून एक नोव्हेंबरपासून गळीत हंगाम सुरू करण्याची तयारी करा असे निर्देश यावेळी आमदारांनी अधिकाऱ्यांना दिले. आमदारांसमवेत कारखान्याच्या गेस्ट हाऊसमध्ये मुख्य अभियंता अभिषेक कुमार, मुख्य ऊस अधिकारी खिमानंद, मुख्य रसायन तज्ञ चंद्रदीप सिंह, राहुल देव आदींसह अधिकारी बैठकीस उपस्थित होते. यावेळी गळीत हंगामाच्या तयारीचा आढावा घेण्यात आला.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, आमदार आदेश चौहान यांनी सांगितले की, साखर कारखान्याच्या अधिकाऱ्यांनी मशीन दुरुस्तीचे काम कोणत्याही परिस्थिती ऑक्टोबर अखेरपर्यंत पूर्ण करण्याची हमी दिली आहे. कारखाना एक नोव्हेंबरला सुरू होईल. गेल्या वर्षी २७,६५,००० क्विंटल ऊसाचे गाळप करण्यात आले होते. यंदा ३० लाख क्विंटल उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे असे सांगण्यात आले. त्यानंतर आमदारांनी कर्मचाऱ्यांसोबत संवाद साधला. यावेळी गजेंद्र चौहान, सर्वेश चौहान, हिमांशू नंबरदार, राजेंद्र सिंह, प्रमोद कुमार, राजवीर सिंह आदी उपस्थित होते.