अलीगढ : बरौलीचे आमदार दलवीर सिंह ठाकूर यांनी अचानक साखर कारखान्याला भेट देऊन पाहणी केली. कारखाना कार्यस्थळावर ऊस घेऊन आलेल्या शेतकऱ्यांशी संवाद साधला.
गेल्या काही दिवसांपासून साखर कारखाना गेल्या काही दिवसांपासून अडचणींतून वाटचाल करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतप्त भावना आहे. शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कारखान्याच्या परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलेल्या आमदार ठाकूर यांनी लखनौतील उच्चाधिकाऱ्यांना या स्थितीची माहिती दिली. फेडरेशनच्या विविध साखर कारखान्यांच्या इंजिनीअर्सना कारखान्यात पाठवण्यात आले. शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांकडून आलेल्या तक्रारींनंतर कारखान्याच्या चिफ केमिस्टला निलंबीत करण्यात आले. कारखान्यासाठी यंत्रसामुग्री खरेदी करताना कमिशन घेतले गेल्याची माहिती आमदार ठाकूर यांना मिळाली. त्याबाबत ऊस विभागाच्या कार्यकारी संचालकांकडे करून ऊस अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश देण्यात आले. कारखान्याच्या व्यवस्थापकांसोबत पाहणी करून कारखान्याला दिलेले टार्गेट पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी प्रवक्ते सुशील गुप्ता, विजय कुमार उर्फ पप्पू भय्या आदी उपस्थित होते.