नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उष्णतेची लाट रोखण्यासाठी केलेले व्यवस्थापन आणि मान्सूनच्या तयारीचा आढावा याबाबत बैठक घेतली. या बैठकीत आयएमजी, एनडीएमएने देशात मार्च-मे २०२२ या कालावधीतील उच्च तापमानाबाबत माहिती दिली. या बैठकीत राज्ये आणि केंद्रशासीत प्रदेशांना राज्य, जिल्हा, शहर स्तरावर मानक प्रक्रियेच्या रुपात उष्णतेची लाट रोखण्यासाठी प्लॅन तयार करण्याचा सल्ला देण्यात आला. याशिवाय दक्षिण-पश्चिम मान्सूनच्या तयारीबाबत सर्व राज्यांनी पूर प्रतिबंधक योजना तयार करावी आणि यासाठी योग्य तयारीबाबत सल्ला देण्यात आला. एनडीआरएफला पूर प्रतिबंधक राज्यात तैनात करण्याबाबत सूचना देण्यात आल्या.
न्यूज २४ऑनलाइन या वेबसाइटने दिलेल्या वृत्तानुसार, सोशल मीडियाचा माहिती प्रसारणात व्यापक उपयोग करावा असे सांगण्यात आले. बैठकीत पंतप्रधान मोदी यांनी आपण उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या आगीसारख्या घटना तसेच मृत्यूंपासून बचावासाठी उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली. अशा प्रकारच्या घटना घडल्यास अतिशय कमी वेळेत उपाय केले गेले पाहिजेत असे ते म्हणाले. वाढते तापमान पाहता नियमित रुग्णालयांत अग्नि सुरक्षा ऑडिट केले गेले पाहिजे. जंगलातील हस्तक्षेप थांबावावा, संभाव्य आगीच्या घटनांचा शोध घेणे व प्रतिबंधक उपायंविषयी चर्चा केली. आगामी मान्सूनची स्थिती पाहता पेयजलाची गुणवत्ता निश्चित करण्यासाठी तसेच प्रदूषण, पाण्याशी संबंधीत आजारांचा प्रसार रोखण्यासाठी उपाययोजना करण्याची सूचना केली.