गाजियाबाद : कोरोना संक्रमणाच्या काळातही मोदी शुगर मिलचे गाळप मे महिन्याच्या मध्यावधीपर्यंत सुरू राहील अशी शक्यता आहे. शेतकऱ्यांकडील ऊस संपल्यानंतरच कारखाने बंद केले जातील असे कारखाना व्यवस्थापनाने सांगितले. मोदी शुगर्सने गेल्यावर्षी ९१.२८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. तर हंगाम मे अखेरपर्यंत सुरू राहिला होता.
चालू हंगामात आतापर्यंत मोदी शुगर्सने ७५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. यावेळीही उच्चांकी स्तरावर उसाचे गाळप करूनच कारखान्याचा हंगाम समाप्त होईल असे मोदी शुगर मिलच्या पीआर विभागाचे महाव्यवस्थापक डी. डी. कौशिक यांनी सांगितले. यावेळी मे महिन्यातील निम्मे दिवस गाळप होऊ शकेल. शेतकऱ्यांनी कारखान्यांना वेळेत ऊस पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मोदी शुगर मिलने गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा गतीने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. डी. डी. कौशिक यांनी सांगितले की, साखर कारखान्याचे मालक शेठ उमेश कुमार मोदी यांनी स्वतःकडील ४२ कोटी रुपये शेतकऱ्यांना ऊस बिलांचे पैसे देण्यासाठी दिले आहेत. गेल्या हंगामातील सर्व पैसे देण्यात आले आहेत. आता चालू हंगामातील पैसे दिले जात आहेत. शेतकऱ्यांना लवकरात लवकर पैसे मिळावेत यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या समस्यांची माहिती कारखाना प्रशासनाला आहे असे कौशिक म्हणाले.