मोहालीतील स्टार्टअप ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तंत्रज्ञान विकसित करणार

चंदीगढ : प्लाक्षा विद्यापीठात दोन प्राध्यापकांनी स्थापन केलेल्या, मोहाली येथील एजीमित्रा टेक्नोलॉजीज (पी) लिमिटेड देशातील अशा चार स्टार्टअप्सपैकी एक आहे, ज्यांना सॉफ्टवेअर टेक्नोलॉजी पार्क ऑफ इंडिया (STPI) कडून ऊस पिक विकासाच्या उपाययोजनांसाठी २० लाख रुपयांचे अनुदान देण्यात आले आहे. STPI, इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचा स्वायत्त विभाग आहे.

मोहाली येथील प्लाक्षा विद्यापीठात इनक्यूबेट केलेला एजीमित्रा हा एक एआय आधारित स्टार्टअप आहे. त्याची स्थापना असोसिएट प्रोफेसर डॉ. शशांक तामस्कर आणि असिस्टेंट प्रोफेसर डॉ. अमृता आर. बेहरा यांनी केली आहे. दोघेही विद्यापीठाच्या सेंटर फॉर डिजिटल ॲग्रिकल्चरमध्ये कार्यरत आहेत. स्टार्टअप साखर उद्योग आणि शेतकऱ्यांसाठी कृषी तंत्रज्ञानाचा विकास करणार आहे.

डॉ. तामसकर यांनी सांगितले की, ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर उद्योग पिकाचे उत्पादन आणि शुक्रोज साहित्याबाबत चिंतेत आहे. ऊस पिकासाठी पुरशा खतांची उपलब्धता आणि पाण्याचा पुरेसा पुरवठा या बाबी महत्त्वाच्या आहेत. त्यात जर बदल झाला तर पिकावर परिणाम होतो. उसातील उच्च स्तरावरील शुक्रोज सूक्ष्म हवामान, रोपांची फिजिओलॉजी, मातीचा ओलसरपणा अशा वैशिष्ट्यांवर विविध टप्प्यांवर अवलंबून असते. त्यामुळे पिकाचे अनुमान काढणे कठीण बनते. ते म्हणाले की, आम्ही एआय, ड्रोन, उपग्रहावर आधारित रिमोट सेन्सिंग, इंटरनेट ऑफ थिंग्स (IoT) सेन्सर याचा वापर करीत आहोत. त्यातून शेतकऱ्यांना आणि साखर उद्योगाला पिकांबाबत स्मार्ट निर्णय घेण्यास आणि आपल्या पिकाला चांगले मूल्य मिळविण्यास मदत होईल. इतर सार्टअप्समध्ये पुण्यातील एजीऑटोमे़ट (पी) लिमिटेड, जी. बी. पंत युनिव्हर्सिटी ऑफ ॲग्रीकल्चर (उत्तराखंड) आणि सत्ययुक्त ॲनालिटिक्स (पी) लिमिटेड (बेंगळुरू) यांचा समावेश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here