मोलॅसीसच्या दराने उसळी घेतली आहे. मोलॅसीसचा दर ६०० रुपये ते ७०० रुपये क्विंटलपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळेल. शेतकऱ्यांना वेळेवर ऊस बिले देण्यास यामुळे मदत होणार आहे.
डिस्टलरी सुरू झाल्याने मोलॅसीसची मागणी वाढली आहे. त्यामुळे मोलॅसीसच्या दराने अचानक उसळी घेतली आहे. त्यामुळे कारखाने आता मोलॅसीस विक्री करून शेतकऱ्यांना पैसे देऊ शकतात. काही महिन्यांपूर्वी मोलॅसीसचा दर २५० रुपये क्विंटल होते. गेल्या काही वर्षात डिस्टिलरी बंद झाल्याने हे दर ५० रुपये क्विंटलपर्यंत खाली घसरले होते. मात्र, आता दर वाढू लागल्याने साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे. हे दर आणखी वाढतील अशी शक्यता व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी ६२ लाख ८५ हजार क्विंटल मोलॅसीसचे उत्पादन केले आहे. धामपूर, स्योहारा, बिलाई, बहादरपूर, बरकातपूर, बुंदकी, चांदपूर, बिजनौर, नजीबाबद या कारखान्यांनी हे उत्पादन केल्याची माहिती जिल्हा ऊस अधिकारी कार्यालयाने दिली. आतापर्यंत कारखान्यांनी ६ लाख ३५ हजार क्विंटल मोलॅसीस विक्री केली आहे.
जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले की, बिजनौरमध्ये ब्राझील प्रमाणे ऊसाच्या रसापासून इथेनॉल निर्मिती केली जाऊ शकते. धामपूर कारखान्यात याची सुरुवात होणार आहे. अन्य कारखान्यांमध्येही अशी प्रक्रिया करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. यावेळी मोलॅसीसचे दरही ६०० ते ७०० रुपये प्रती क्विंटलवर पोहोचले आहेत. त्यामुळे साखर कारखान्यांना दिलासा मिळाला आहे असे बिजनौर साखर कारखान्याचे प्रशासन अधिकारी ए. के. सिंह यांनी सांगितले.
तर जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह म्हणाले, डिस्टलरी सुरू झाल्याने मोलॅसीसचे दरही वाढले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या थकीत ऊस बिलाची समस्याही कमी होईल असे त्यांनी सांगितले.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link