लातूर : रस्ते अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्याच्या कुटूंबियांना पाच लाख रुपयांच्या अपघाती विम्याचा धनादेश देण्यात आला. आ. अभिमन्यू पवार यांनी हा कारखाना चालविण्यास घेतला आहे. त्या अंतर्गत त्यांनी कारखान्यात कामाला असलेल्या कामगारांचा अपघाती विमा उतरविला आहे. कारखान्यातील हेल्परच्या मृत्यूनंतर किल्लारी कारखाना प्रशासनाने याची दखल घेत त्यांच्या वारसास अपघाती विमा मिळवून देण्यास प्रयत्न केला.
सिरसल येथील श्याम अंगद गिरी हे कारखान्यात ४ एप्रिल २०२३ पासून इंजीनियरिंग विभागात हेल्पर म्हणून कामावर रुजू होते. परंतु १९ जानेवारी २०२४ रोजी त्यांचा किल्लारी पोलिस स्टेशनच्या हद्दीत लातूर – उमरगा रोडवर अपघाती मृत्यू झाला होता. किल्लारी कारखान्याचे अध्यक्ष आ. अभिमन्यू पवार यांच्या हस्ते २३ जुलै रोजी मनीषा शाम गिरी यांना त्यांच्या घरी जाऊन पाच लाखांचा धनादेश देण्यात आला. प्रभारी कार्यकारी संचालक तुकाराम पवार, संतोष वाडीकरसह बालाजी हांडे, बालाजी निकम व नागरिक उपस्थित होते.
साखर उद्योगाच्या बातम्यांबद्दल अधिक वाचण्यासाठी, Chinimandi.com वाचत रहा.