मुंबई : महाराष्ट्रात १५ सप्टेंबरपासून मान्सून पुन्हा सक्रिय होणार आहे. बुधवारपर्यंत वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. हा पट्टा दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश किनारपट्टीपासून पश्चिम-वायव्य दिशेने सरकेल असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) अंदाज वर्तवला.
एबीपी लाईव्हने दिलेल्या वृत्तानुसार, आयएमडी पुणेच्या हवामान अंदाज विभागाचे प्रमुख अनुपम कश्यपी म्हणाले की, “या हालचालींची दिशा महाराष्ट्रासाठी फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे. यातून मध्य महाराष्ट्रातील घाटांसह राज्यात सक्रिय पाऊस पडेल. १६ सप्टेंबर रोजी विलग मुसळधार पाऊस पडेल. मुसळधार पाऊसही पडू शकतो. आम्ही राज्याच्या काही भागांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. परिस्थिती पाहून यामध्ये ऑरेंज अलर्टपर्यंत सुधारणा होवू शकते.
ते म्हणाले की, “बहुतांश हंगामात खराब मान्सूनचा फटका सहन करणार्या महाराष्ट्रासाठी ही आनंदाची बातमी आहे. शेतकर्यांनाही याचा फायदा होण्याची शक्यता आहे. पुणे शहरात १५ ते १८ सप्टेंबर यांदरम्यान मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो. पुढील २४ तासात राज्यात हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. कोकण वगळता इतरत्र अतिवृष्टी होऊ शकते. १४-१६ सप्टेंबर दरम्यान ढगाळ वातावरण राहील. राज्यात वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता बळावली आहे.