शिमला: हिमाचल प्रदेशातील यंदाच्या मान्सूनमध्ये 63 जणांचा बळी गेला आहे, यातील 25 जण मरण पावले, अशी माहिती मुख्यमंत्री जय राम ठाकूर यांनी विधानसभेत दिली. 1 जुलैपासून खराब झालेले रस्ते, थांबलेला पाणीपुरवठा व वीज पुरवठा यामुळे राज्याचे एकूण 625 कोटी रुपयांचे नुकसान झाले. हे सारे पूर्ववत करण्यासाठी राज्य सरकार युद्धपातळीवर काम करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
ठाकूर म्हणाले, अतिवृष्टीमुळे एक हजाराहून अधिक रस्ते, अनेक पूल, सार्वजनिक बांधकाम विभागाची मालमत्ता, वॉटर लाईन्स पूर्ण किंवा अंशत: खराब झाल्या आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे (पीडब्ल्यूडी) 323 कोटी रुपयांचे नुकसान झाले, तसेच पाटबंधारे व सार्वजनिक आरोग्य विभागाचे 269 कोटी रुपयांचे नुकसान झाले, असेही ते म्हणाले.\
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.