नवी दिल्ली : यंदा मान्सून ठरलेल्या वेळेत एक जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचेल असे अनुमान हवामान विभागाचे महासंचालक मृत्यूंजय महापात्र यांनी व्यक्त केले आहे. हवामान विभागाने यंदा पावसावर नियमित नजर ठेवली असल्याचे सोशल मीडियात दिलेल्या माहितीवरून दिसून येते.
हवामान विभागाने सांगितले की हे पावसाचे पुर्वानुमान आहे. विभागाकडून १५ मे रोजी मान्सूनची घोषणा केली जाईल. तर पुढील चार महिन्याच्या पावसाचा अंदाज ३१ मे रोजी व्यक्त केला जाईल.
यावर्षी मान्सून सामान्य राहील असा अंदाज यापूर्वी महापात्र यांनी व्यक्त केला होता. देशातील शेतकऱ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी म्हटली जात आहे. एक जून रोजी केरळच्या किनाऱ्यावर पोहोचलेला मान्सून पुढील चार महिने चांगल्या पद्धतीने कार्यरत राहील.
पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे सचिव एम. एन. राजीवन यांनी सांगितले की हवामानाचा अंदाज पुरेसा आहे. ही माहिती हवामानाच्या पूर्व अनुमानावर व्यक्त केली आहे. त्यानुसार मान्सून सामान्य रुपात राहील अशी दाट शक्यता आहे. यापूर्वी हवामान विभागाने यावर्षी १२१ वर्षानंतर १३ व्या वेळी एप्रिल महिला हा सर्वात गरम असे सांगितले होते. या महिन्यात उच्चांकी ३४ अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले आहे. मे महिन्याच्या दुसऱ्या सप्ताहात उकाड्यापासून काही दिलासा मिळेल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.