आयएमडीकडून गुड न्यूज: महाराष्ट्रात लवकरच होणार मान्सूनची एन्ट्री

मुंबई : महाराष्ट्रातील लोकांकडून मान्सूनची प्रतीक्षा सुरू आहे. यादरम्यान, भारतीय हवामानशास्त्र विभागाने (आयएमडी) मान्सून बाबत एक दिलासादायक वृत्त दिले आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, आधी मान्सून उशीरा दाखल होत असल्याचे सांगितले जात होते. मात्र, मान्सून आपल्या नियमित वेळेनुसार येत असून त्याच्यासाठी अनुकूल परिस्थिती तयार होत आहे. नव्या पुर्वानुमानामध्ये हवामान विभागाने सांगितले की, मान्सूनची भारतात वेळेवर एन्ट्री होऊ शकते. जूनच्या पहिल्या आठवड्यात मान्सून केरळमध्ये प्रवेश करेल अशी शक्यता आहे. तर तो महाराष्ट्रात ७ जूनपर्यंत पोहोचेल.
पत्रिकामध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, पुणे हवामानशास्त्र विभागाने राज्यात ७ जूनपर्यंत मान्सून येईल. आधी तो तळकोकणात पोहोचेल असे म्हटले आहे. मान्सूनसाठी अनुकूल वातावरण आहे. अरबी समुद्रात बाष्पासह वारे वाहू लागल्यानंतर मान्सून महाराष्ट्राकडे गतीने  येईल. अनुकूल स्थितीमुळे मान्सून केरळमध्ये ४ जूनऐवजी एक जूनमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ तो महाराष्ट्राकडे सरकेल.

 

यंदा दक्षिण पश्चिम मान्सूनने तीन दिवसांपूर्वी, १९ मे रोजी अंदमान सागरात हजेरी लावली होती. त्यानंतर त्याची गती मंदावली. स्कायमेटचे अध्यक्ष जी. पी. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार, पुढील २-३ दिवसांत बंगालची खाडी, अंदमान आणि निकोबार द्वीप समुहात मान्सूनला पुढे सरकण्यासाठी उत्तम स्थिती आहे. मुंबईत ११ जूनच्या आसपास मान्सून पोहोचू शकतो. कोकणात २७ मेपासून पावसाची शक्यता हवामान विभागाने आधीच वर्तवली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here