नवी दिल्ली : लोकसभेतील एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी बुधवारी सांगितले की, देशात पूर्ण जून २०२२ या महिन्यात मान्सूनचा पाऊस सामान्य झाला आहे. त्यांनी सांगितले की, पूर्व आणि पूर्वोत्तर भारतात अधिक आणि मध्य भारतात कमी पाऊस झाला आहे. जून २०२२ यामध्ये पूर्ण देशात मान्सूनच्या पावसाची सामान्य दीर्घ कालावधीची सरासरी (एलपीए) ९२ टक्के होती. १९७१ ते २०२० या कालावधीतील आकडेवारीच्या आधारावर जून महिन्यात पावसाची एलपीए १६५.४ मिमी आहे. जर या कालावधीतील एलपीए ९२ ते १०८ टक्के यांदरम्यान असेल तर जून महिन्यातील पावसाला सामान्य म्हटले जाते.
मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, या वर्षी केरळमध्ये मान्सूनची सुरुवात २९ मे २०२२ रोजी झाली होती. सामान्य स्थितीतील १ जूनच्या आधी तीन दिवस मान्सून आला होता. मात्र, मान्सून ८ जुलैच्या सामान्य काळाच्या तुलनेत २ जुलै २०२२ रोजी संपूर्ण देशात पसरला. मध्य भारतात कमी दबाव प्रणालीमुळे आणि गतीमुळे जुलै महिन्यात मान्सून सक्रिय राहिला. मान्सूनची ट्रफ सामान्य स्थितीत दक्षिणेत आहे.
आयएमडी जारी केलेल्या अहवालाच्या आधारे डॉ. जितेंद्र सिंह यांनी सांगितले की, उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगाल, मेघालय आणि नागालँड या पाच राज्यांत अलीकडेच ३० वर्षांच्या कालावधीत (१९८९-२०१८) दक्षिण-पश्चिम मान्सूनचा पाऊस उल्लेखनिय रित्या कमी झाला आहे. अरुणाचल प्रदेश आणि हिमाचल प्रदेशासोबतच या पाच राज्यांत वार्षिक पावसातही लक्षणीय घट झाली आहे.