नवी दिल्ली : दक्षिण-पश्चिम मान्सून कालपासून अरबी समुद्राचा उत्तर भाग, गुजरातच्या पूर्वेकडील परिसर, सौराष्ट्र, दक्षिण-पूर्व राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेशच्या काही भागात पुढे सरकला आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत अरबी समुद्र, गुजरातचा उर्वरीत भाग आणि दक्षिण राजस्थान, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मान्सून पोहोचेल असे आयएमडीचे म्हणणे आहे.
हवामान विभागाने उत्तराखंड, पूर्व उत्तर प्रदेश, पूर्व मध्य प्रदेश, गुजरातचा काही भाग, कर्नाटक किनारपट्टीवर ठिकठिकाणी पावसाचे अनुमान व्यक्त केले आहे. पश्चिमी उत्तर प्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा, कर्नाटकच्या दक्षिण भागात जोरदार पावसाची शक्यता आहे. पश्चिम बंगाल आणि सिक्किम, अंदमान व निकोबार द्वीपसमूह, अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा, सौराष्ट्र, कच्छ, तेलंगणा, तामीळनाडू, पुद्दुचेरी तसेच कराईकल, केरळमध्येही एक-जोन ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो.
राजस्थान, मध्य प्रदेश आणि तेलंगणामध्ये एक-दोन ठिकाणी ३० ते ४० किमी प्रती तास वेगाने वारे वाहतील. जम्मू काश्मीर, लडाख, गिलगिट-बाल्टिस्तान, मुजफ्फराबाद, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, चंडीगड और दिल्ली, उत्तर प्रदेश, विदर्भ, छत्तीसगड, बिहार, झारखंड, अरुणाचल प्रदेश, आसम, मेघालय, नागालँड, मणिपुर, मिजोरम आणि त्रिपुरा, गुजरात तसेच मराठवाड्याकडे पाऊस सरकू शकतो. बंगालच्या खाडीसह अंदमान, निकोबार, पश्चिम बंगाल, ओडिसा, आंध्र प्रदेशात ५० ते ६० किमी वेगाने वारे वाहतील. हवामानातील बदलांममुळे केरळ, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये मासेमारीला नागरिकांनी जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे.
सद्यस्थितीत बिहार, युपीत चांगल्या पावसाने शेतातील पेरण्यांच्या कामांनी गती घेतली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link