नवी दिल्ली : मान्सूनच्या माघारीला 1 महिना उशिर झाला आहे. मान्सून 10 ऑक्टोबरपासून माघार घेण्याची शक्यता, भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. आयएमडी लाँग पिरियडच्या अहवालानुसार (एलपीए) 110 टक्के पावसाची नोंद झाली असून, त यंदा मान्सून सामान्यपेक्षा अधिक प्रमाणात होता. हाच एलपीए 1961 ते 2010 दरम्यान 88 सेंटीमीटर होता.
दि. 6 आँक्टोबरच्या सुमारास समुद्राच्या सपाटीपासून 1.5 किलोमीटर वर राजस्थानात चक्री वादळाविरोधी वातावरणाची शक्यता निर्माण झाल्यामुणे 10 ऑक्टोबरच्या सुमारास वायव्य भारतातून नैऋत्य मान्सूनची माघार सुरु होण्याची शक्यता असल्याचा अंदाच हवामान खात्याने वर्तवला आहे. दि. 7 ऑक्टोबरनंतर वायव्य भारतात पाउस थांबण्याची शक्यता असल्याचे, स्कायमेट वेदरचे उपाध्यक्ष महेश पलावत यांनी सांगितले. साधारणपणे 1 सप्टेबर पासून राजस्थानातून मान्सून माघार घेण्यास सुरुवात करतो.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.