यावर्षी देशात मान्सून सामान्य राहील: IMD

नवी दिल्ली : केरळमध्ये ४ जून रोजी मान्सून सुरू होईल, अशी अपेक्षा असल्याचे भारतीय हवामान शास्त्र विभागाने (IMD) शुक्रवारी सांगितले. आयएमडीने म्हटले आहे की, आम्ही मान्सून ४ जूनच्या आसपास केरळमध्ये येण्याची अपेक्षा करीत आहोत. पुढील आठवड्यात अरबी समुद्रात कोणत्याही चक्रीवादळाच्या शक्यता नाही. IMD च्या म्हणण्यानुसार, उत्तर पश्चिम भारतामध्ये सामान्यपेक्षा कमी पाऊस पडेल.

IMD ने सांगितले की, देशाच्या उत्तर भागात मान्सूनपूर्व पाऊस हा हवामानातील पाश्चिमात्य विक्षोभाच्या घटनांमुळे होतो. आम्ही पाऊस आणि ढगांच्या गडगडाटाची स्थिती पाहिली आहे. त्यामुळेच दिल्ली आणि शेजारील शहरांना थोडा दिलासा मिळेल असे दिसून येत आहे. जर पाऊस सगळीकडे समान स्थितीत कोसळला तर ती आदर्श स्थिती असेल. देशात दर पाऊस प्रत्येक ठिकाणी समान असेल तर शेतीवर त्याचा फारसा परिणाम होणार नाही.

दक्षिण पश्चिम मान्सून नेहमी १ जून रोजी केरळमध्ये दाखल होतो. भारतीय हवामानशास्त्र विभागाने (IMD) २००५ नंतर केरळच्या मान्सून सुरुवातीच्या तारखांसाठी पुर्वानुमान जारी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या वर्षी केरळमध्ये मान्सून २७ मे रोजी येईल या आयएमडीच्या भविष्यवाणीनंतर दोन दिवसांनी, २९ मे रोजी दाखल झाला होता. IMD ने सांगितले की, गेल्या १८ वर्षांमध्ये (२००५-२०२२) केरळमध्ये मान्सूनची सुरुवातीची तारीख २०१५ चा अपवाद वगळता पुर्वानुमानानुसार झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here