नवी दिल्ली : देशातील कोट्यवधी लोकांसह शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने खुशखबर दिली आहे. हवामान विभागाने यावर्षी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत सामान्य पाऊस होण्याचे अनुमान वर्तवले आहे.सामान्य पावसाचा सामान्य कालावधी सरासरी (एलपीए) ९६ ते १०४ टक्के इतका असेल.
IMDने सांगितले की, दक्षिण-पश्चिम मान्सून (जुलै ते सप्टेंबर) पूर्ण देशात सामान्य पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याचा दीर्घ कालावधी (एलपीए) ९६ ते १०४ टक्के असेल. मान्सूनचा कालावधी (LPA) ९९ टक्के होण्याची शक्यता आहे. ला नीनाची स्थिती भूमध्यरेखीय प्रशांत क्षेत्रामध्ये असेल. नवीन मान्सून मिशन क्लायमेट फोरकास्ट सिस्टीम (MMCFS), यासोबतच इतर जलवायू मॉडेल पूर्वानुमानानुसार ला नीनाची स्थिती मान्सूनच्या कालावधीत कायम राहण्याची शक्यता आहे. आयएमडीकडून मे २०२२ च्या अंतिम आठवड्यात संपूर्ण पावसाळ्यासाठी अद्ययावत पूर्वानुमान जारी करेल.