नवी दिल्ली : केंद्रीय अन्न मंत्रालयाने २७ मार्च रोजी झालेल्या घोषणेनुसार, एप्रिल २०२५ साठी २३.५ लाख मेट्रिक टन (एलएमटी)चा मासिक साखर कोटा मंजूर केला आहे. एप्रिल २०२४ साठी दिलेल्या कोट्यापेक्षा हा कोटा कमी कमी आहे. याव्यतिरिक्त, सरकारने मार्चचा कोटा १० एप्रिलपर्यंत वाढवला आहे.
सरकारने देशांतर्गत विक्रीसाठी एप्रिल २०२४ मध्ये, २५ लाख मेट्रिक टन साखरेचा मासिक कोटा दिला होता. तर मार्च २०२५ साठी साखरेचा कोटा २३ लाख मेट्रिक टन होता. बाजारातील तज्ज्ञांच्या मते, कॅरीफॉरवर्ड स्टॉक सुमारे १ लाख टन असण्याची अपेक्षा आहे. उन्हाळा आणि तापमानात वाढ होण्याची शक्यता असल्याने बाजारपेठेतील मागणी मजबूत राहण्याची अपेक्षा आहे. गेल्या वर्षी एप्रिलमध्ये साखरेचा वापर २५.८० लाख टन होता. हे लक्षात घेता, बाजारात तेजीचे वातावरण अपेक्षित आहे.