मुंडेरवा : आडसाली ऊस लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी घर घर दस्तक अभियानांतर्गत रॅली काढण्यात आली. यावेळी अपर ऊस आयुक्त व्ही. के. शुक्ल यांनी ऊस उत्पादन वाढीसाठी सरकारकडून सुरू असलेल्या विविध उपाय योजनांची माहिती दिली. अश्रफपूरमध्ये आयोजित मेळाव्यात अपर ऊस आयुक्तांनी शास्त्रोक्त पद्धतीने ऊस लागवड केल्यास अधिक लाभ मिळेल असे सांगितले. साखर कारखान्यांकडून शेतकऱ्यांना अनुदानावर बियाणे, खते, किटकनाशके आदी उपलब्ध करून दिली जात असल्याचे सांगण्यात आले. स्वयंसाह्यता गटांतील महिलांना ऊस लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी मदतीचे आवाहन केले.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, जिल्हा ऊस अधिकारी मंजू सिंह यांनी सरकारच्या विविध योजनांची शेतकऱ्यांना माहिती दिली. कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक ब्रजेंद्र द्विवेदी यांनी सांगितले की, ऊस उत्पादन वाढल्यास शेतकऱ्यांना अधिक फायदा होईल. यावेळी काढण्यात आलेली रॅली साखर कारखाना परिसरातून डारीडीहा, पिपराकला, टेमा रहमत, छपिया, सालेपुर, अश्रफपूर, कुर्थिया, मोहनाखोर, ठकुरापार, नेवारी, शोभनपार आदी परिसरात फिरली. कार्यक्रमात ऊस सल्लागार एस. पी. मिश्र, कारखान्याचे ऊस व्यवस्थापक कुलदीप द्विवेदी यांची भाषणे झाली. यावेळी विश्वजीत पाल, विनोद राय, फुलचंद पटेल, परशुराम यादव, रमेश सिंह, डॉ. उपेंद्र कुमार आदी उपस्थित होते.