हंगाम २०२२-२३ मध्ये (ऑक्टोबर-नोव्हेंबर) महाराष्ट्रात साखर कारखान्यांची विक्रमी संख्या पाहायला मिळू शकेल. दि इंडियन एक्स्प्रेसमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, साखर आयुक्त कार्यालयाकडे २१५ कारखान्यांनी गाळप परवान्यासाठी अर्ज केले आहेत. गेल्या हंगामात २०५ कारखान्यांनी अर्ज केले होते. विविध घटकांची पडताळणी करून या कारखान्यांना गाळप परवाना दिला अथवा नाकारला जातो. हे सर्व कारखाने सुरू राहू शकतील की नाही, याची तपासणी केली जाईल. आर्थिक व्यवहार्यता आणि तयारी अशा मुद्यांवर अंतिम निर्णय घेतला जातो. साखर आयुक्त कार्यालयाने या हंगामात आतापर्यंत १६५ गाळप परवाने जारी केले आहेत. यामध्ये ८४ सहकारी कारखान्यांचा समावेश आहे. उर्वरीत कारखाने खासगी आहेत.
प्रसार माध्यमातील वृत्तानुसार २१५ कारखान्यांपैकी १६ कारखाने गेल्या हंगामात बंद होते अथवा काहींनी या हंगामात नव्याने परवान्यासाठी अर्ज केला आहे. यामध्ये दहा कारखाने सहकारी असून उर्वरीत खासगी आहेत. पाण्याची पुरेशी उपलब्धता झाल्याने अहमदनगर, सोलापूर आणि औरंगाबाद विभागात शेतकऱ्यांनी ऊस लागवड क्षेत्र वाढवले आहे.
सोमवारपर्यंत ९३ कारखाने सुरू झाले आहेत. यापैकी ४७ कारखाने खासगी असून उर्वरीत ४६ कारखाने सहकारी आहेत. जोरदार पावसामुळे यंदा साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होण्यास उशीर झाला आहे.