साखर कारखान्यांकडून गेल्यावर्षीपेक्षा अधिक ऊसाचे गाळप

बिजनौर : जिल्ह्यातील ऊस गाळप हंगामाची सोमवारी रात्री समाप्ती झाली. ऊस पिक कमी असल्याच्या शक्यता वर्तविल्या गेल्या असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी गेल्यावर्षीपेक्षा अधिक ऊस गाळप केले. यावर्षी गुऱ्हाळे, घाणा, क्रशरवरही मोठ्या प्रमाणावर उसाची विक्री झाली. घाणा आणि क्रशर मध्ये ऊसाचे अधिक गाळप झाले.

गेल्या वर्षी साखर कारखान्यांचा हंगाम जूनच्या मध्यावधीपर्यंत सुरू राहीला होता. मात्र, यंदा वेळेआधीच गाळप पूर्ण झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ऊसाची लागण ११ टक्क्यांनी वाढली होती. मात्र, उत्पादन १५ टक्क्यांनी घटण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली होती. सुरुवातीला उसाचे उत्पादन कमी झाल्याचे दिसले. मात्र, नंतरच्या टप्प्यात उत्पादन वाढले.

गेल्या वर्षी कारखान्यांनी ११ कोटी ३८ लाख क्विंटल उसाचे गाळप केले होते. यंदा ११ कोटी ४५ लाख क्विंटल गाळप झाले आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांनी ३६७० कोटी रुपयांच्या उसाची विक्री केली होती. यावर्षी कारखान्यांनी खरेदी केलेल्या उसाची किंमत अद्याप उघड झालेली नाही. मात्र, गेल्यावर्षीपेक्षा अधिक ऊस खरेदी करण्यात आला आहे. जर यावर्षी गुऱ्हाळे, क्रशर सुरू नसते तर गाळप आणखी वाढले असते. जिल्ह्यातील ऊस हंगाम समाप्त झाला असून कारखान्यांना शेतकऱ्यांचे पैसे देण्याबाबत पाठपुरावा सुरू असल्याचे जिल्हा ऊस अधिकारी यशपाल सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, यंदा साखर कारखान्यानी उच्च प्रतीच्या गुळाचे उत्पादन घेतले. गेल्यावर्षी कारखान्यांनी ५४.८९ लाख क्विंटल गुळ निर्मीती केली. यंदा ६२.२७ लाख क्विंटल गूळ उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर उत्पादन घटले आहे. गेल्यावर्षी कारखान्यांनी १३२.८६ लाख क्विंटल साखर उत्पादन केले होते. यंदा गेल्यावर्षीपेक्षा कमी १२७.२९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here