महाराष्ट्रात २०० लाख क्विंटलहून अधिक साखर उत्पादन

साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार, हंगाम २०२१-२२ मध्ये ३० नोव्हेंबरअखेर महाराष्ट्रात एकूण १७२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ८६ सहकारी तर ८६ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत २२२.४ लाख टन उसाचे गाळप करण्यात आले आहे. तर २०३.४३ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१५ टक्के आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक ४१ साखर कारखाने सोलापूर विभागात सुरू आहेत. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार ३० नोव्हेंबरअखेर सोलापूर विभागात ५१.८९लाख टन उसाचे गाळप झाले असून ४२.८८ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ८.२६ टक्के आहे.

कोल्हापूर विभागाचा साखर उतारा १० टक्क्यांवर आहे. राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन याच विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात ५८.५४ लाख टन उसाचे गाळप झाले असून ६१.०९ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा १०.४४ टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here