डोईवाला : डोईवाला साखर कारखान्याच्या गळीत हंगाम २०२२-२३ चा रविवारी समाप्त झाला. या गळीत हंगामात साखर कारखान्याने ३१ लाख २८ हजार ७४४ क्विंटल उसाचे गाळप केले आहे. रविवारी सकाळी सहा वाजता डोईवाला साखर कारखान्याने गळीत हंगाम समाप्त झाल्याची घोषणा केली. साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक डी. पी. सिंह यांनी संगितले की, या वर्षी ३० लाख क्विंटल ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्याचे निश्चित केले होते. तर त्यापेक्षा अधिक गाळप झाले आहे.
लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, गेल्या गळीत हंगामात कारखान्याने २८.७१ लाख क्विंटल ऊस गाळप केले आहे. यावेळी उद्दिष्टापेक्षा अधिक गाळप करण्यात आले आहे. यावेळी ऊस विभागाचे महाव्यवस्थापक आणि मुख्य रसाशन शास्त्रज्ञ पी. के. पांडे, ऊस विभागाचे शिवकुमार शर्मा, सुभाष पाल, डोईवाला ऊस समितीचे चेअरमन मनोज नौटियाल, महेंद्र सिंह आदी उपस्थित होते.