बिजनौर : धामपूर शुगर मिलने गेल्या तीन महिन्यांच्या ऊस गाळपाच्या कालखंडात एकूण ऊस क्षेत्रापैकी जवळपास ५५ टक्के ऊसाचे गाळप केले आहे. साखर कारखान्याने आतापर्यंत १ कोटी ४२ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. तर १४ लाख ४२ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे.
धामपूर साखर कारखान्याचे वरिष्ठ ऊस व्यवस्थापक मनोज चौहान यांनी सांगितले की, धामपूर साखर कारखान्याचे ऊस गाळप यंदा ३० नोव्हेंबरपासून सुरू झाले आहे. जवळपास तीन महिन्यांच्या गाळपानंतर कारखान्याने ५२ हजार हेक्टर क्षेत्रापैकी जवळपास २८ हजार हेक्टर ऊसाचे गाळप केले आहे. धामपूर साखर कारखान्याची प्रतिदिन गाळप क्षमता जवळपास एक लाख ४० हजार क्विंटल आहे. त्या तुलनेत एक लाख २५ हजार क्विंटल प्रती दिन क्षमतेने ऊस गाळप सुरू आहे. असाच वेग कायम राहीला तर मे महिन्याच्या अखेरपर्यंत कार्यक्षेत्रातील सर्व उसाचे गाळप केले जाईल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.