महाराष्ट्रातील ऊस गाळप ६०० लाख टनापेक्षा अधिक

महाराष्ट्रात २०२१-२२ या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणावर साखर कारखान्यांनी सहभाग घेतला आहे. साखर आयुक्तालयाकडील आकडेवारीनुसार हंगाम २०२१-२२ मध्ये १६ जानेवारी २०२२ अखेर महाराष्ट्रात एकूण १९२ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये ९५ सहकारी आणि ९७ खासगी साखर कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत ६००.३३ लाख टन ऊसाचे गाळप करण्यात आले आहे. राज्यात आतापर्यंत ५९५.३३ लाख क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.९१ टक्के आहे.

राज्यात सर्वाधिक साखर कारखाने सोलापूर विभागात कार्यरत आहेत. सोलापूरमध्ये सर्वाधिक ४५ साखर कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. येथे १६ जानेवारी २०२२ अखेर १४२.८६ लाख टन उसाचे गाळप करून १२७.७७ लाख क्विंटल साखर उत्पादन केले आहे.

राज्यात सर्वाधिक साखर उत्पादन कोल्हापूर विभागात झाले आहे. कोल्हापूर विभागात आतापर्यंत १४४.३५ लाख टन उसाचे गाळप करून १६२.७१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. येथील साखर उतारा ११.२७ टक्के आहे.

पुणे विभागात हंगाम २०२१-२२ मध्ये १६ जानेवारी २०२२ पर्यंत एकूण २९ कारखान्यांनी गाळप सुरू केले आहे. यामध्ये १६ सहकारी तर १३ खासगी कारखान्यांचा समावेश आहे. आतापर्यंत १२२.२४ लाख टन उसाचे गाळप झाले आहे. पुणे विभागात १२३.५१ लाख क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. पुणे विभागाचा सरासरी साखर उतारा १०.१० टक्के आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here