आयआयटी-कानपूर आणि एनएसआय-कानपूरमध्ये जैव इंधनासाठी उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी सामंजस्य करार

कानपूर : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटीके)आणि राष्ट्रीय साखर संस्था (एनएसआय) या दोन संस्थांनी जैवइंधनासाठी उत्कृष्ट केंद्र स्थापन करण्यासाठी एका सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे. एनएसआय-कानपूर येथे १५ जून रोजी हा सामंजस्य करार समारंभ झाला. यावेळी केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सहसचिव (साखर)अश्विनी श्रीवास्तव, आयआयटी-कानपूरचे संचालक प्रा. मनिंद्र अग्रवाल आणि एनएसआय- कानपूरच्या संचालक डॉ. सीमा पारोहा उपस्थित होत्या.

सहयोगी संशोधनात अक्षय ऊर्जा स्रोत असलेल्या इथेनॉल, मिथेनॉल, बायो-सीएनजी, विमान इंधन आणि बायोमासपासून ग्रीन हायड्रोजनसारख्या जैवइंधनांचे उत्पादन वाढवण्यावर भर दिला जाईल.उत्तर प्रदेश हे कृषीप्रधान राज्य आणि उसाचे प्रमुख उत्पादक असल्याने जैवइंधन संशोधनासाठी एक आदर्श स्थान आहे. हा उपक्रम राष्ट्रीय जैवइंधन धोरण, २०१८ च्या अनुषंगाने आहे, जे उसावर आधारित फीडस्टॉक आणि अतिरिक्त अन्नधान्यांपासून इथेनॉलच्या उत्पादनास प्रोत्साहन देते. २०२५ पर्यंत पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉल मिसळण्याचे धोरणाचे उद्दिष्ट आहे.

आयआयटी-कानपूरचे संचालक प्रा. मणिंद्र अग्रवाल यांनी दोन संस्थांमधील समन्वयावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की, एनएसआय कानपूरकडे मार्केट डायनॅमिक्स आणि तांत्रिक गरजांमध्ये दीर्घकालीन कौशल्य आहे, तर आयआयटी कानपूर मूलभूत विज्ञान आणि तंत्रज्ञानामध्ये उत्कृष्ट आहे.भारताला जैवइंधनात अग्रेसर बनवण्यासाठी एक अत्याधुनिक हब स्थापन करण्याचे आमचे ध्येय आहे.केंद्रीय सहसचिव (साखर), अश्विनी श्रीवास्तव यांनी सांगितले की, राष्ट्रीय जैवइंधन धोरणात फीडस्टॉक आणि अतिरिक्त धान्य उत्पादनास समर्थन दिले जात आहे. हा सामंजस्य करार २०२५ पर्यंत २० टक्के इथेनॉल मिश्रणाचे लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने आमच्या प्रयत्नांना चालना देईल.

एनएसआय-कानपूरच्या संचालक डॉ. सीमा पारोहा यांनी प्रायोगिक प्रकल्पांसह अत्याधुनिक प्रयोगशाळा आणि आवश्यक उपकरणे असलेली एक समर्पित इमारत उभारली जाईल, असे सांगितले. त्या म्हणाल्या, आम्ही भविष्यात औद्योगिक टाय-अप शोधू .भविष्यातील प्रॉस्पेक्ट्स सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर जैवइंधन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान, ऑप्टिमाइज्ड प्रक्रिया आणि पायलट प्रोजेक्टद्वारे प्रगत, टिकाऊ, उच्च दर्जाचे जैवइंधन उत्पादन वाढवेल. ऊर्जा पुरवठा सुरक्षित करणे, CO2 उत्सर्जन कमी करून हवामानाचे संरक्षण करणे आणि जीवाश्म इंधन आणि कच्च्या तेलाच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करणे हे या उपक्रमाचे उद्दिष्ट आहे. दरम्यान, यावेळी आयआयटी कानपूरचे प्राध्यापक राजीव जिंदाल आणि प्रोफेसर देबोपम दास यांच्यासह एनएसआय कानपूरचे विनय कुमार, अनुप कुमार कनोजिया आणि डॉ. आर. अनंतलक्ष्मी यांचाही सहभाग होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here