‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांचे खटाव तालुक्यात आंदोलन, ऊस वाहतूक ठप्प

सातारा : ऊस दरवाढीसाठी खटाव तालुक्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक बंद केल्याने गाळप हंगाम जवळजवळ ठप्प झाला आहे. पहिली उचल ३५०० आणि मागील थकबाकी तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याची मागणीवर संघटना ठाम आहे. खटाव तालुक्यातून पडळ, गोपूज, जरंडेश्वर, उदगिरी, रायगाव, सह्याद्री, दालमिया आणि वर्धन कारखान्याकडे सुरु असलेली ऊस वाहतूक आंदोलकांनी रोखली.

यावेळी सिद्धेश्वर कुरोली, वडूजसह विखळे फाटा, चितळी फाटा, पडळ फाटा, कातरखटाव, गोपूज परिसरात संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा सहभाग होता. आटपाडी भागातून येणारी ऊस वाहतूक पडळ फाट्यापर्यंत पोलिस बंदोबस्तात आल्याने काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. यापुढे स्वाभिमानी शेतकरी संघटना हे आंदोलन आणखी तीव्र करत ऊस वाहतूक करणारे एकही वाहन दिसू देणार नसल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. संघटनेच्या आंदोलनामुळे ऊस वाहतुकीवर परिणाम झाला असून ऊस तोडही ठप्प झाल्याचे दिसून आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here