किसुमु (केनिया ): केनिया च्या राष्ट्रीय पर्यावरण व्यवस्थापन प्राधिकरणा (Nema) ने प्रदूषण पसरवल्यामुळे किसुमु काउंटी मध्ये असणाऱ्या किबोस एंड एलाइड साखर कारखान्याला ताबडतोब बंद करण्याचे आदेश दिले आहे. गेल्या काही वर्षांपासून या साखर कारखान्यामुळे या परिसरात प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी केल्या जात होत्या.
Nema चे महासंचालक मामो बोरु मामो यांनी सांगितले की, कंपनी 2014 पासून वायु गुणवत्ता नियमांकडे दुर्लक्ष करत आहे. कंपनीने इतरही अनेक आदेशांचे पालन केलेले नाही. हा आदेश कंपनीच्या डिस्टिलरी, पेपर प्लांट, गैस प्लांट आणि एक साखर कारखाना अशा सर्वच संबध्द कारखान्यांना लागू आहे. ते म्हणाले, नेमा ने कारखाना आणि जवळपासच्या परिसरात वायु गुणवत्तेची तपासणी केली. या तपासणीत हवेमध्ये पार्टिकुलेट मैटर (PM) चे प्रमाण राष्ट्रीय वायु गुणवत्ता मानक (10 PM) पेक्षा बरेच अधिक असल्याचे आढळून आले.
ते म्हणाले, जोपर्यंत किबोस साखर कारखाना आपल्या बॉयलर मध्ये परिणामकारक वायु प्रदूषण नियंत्रण सिस्टम बसवून घेत नाही, तोपर्यंत कारखाना बंद राहील, असा आदेश दिला होता. या सिस्टीमला बसवण्यासाठी 5 फेब्रुवारीला कारखान्याला 30 दिवसांचा अवधी दिला होता पण कंपनी या नियमाचे पालन करण्यात अपयशी ठरली.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.