खासदार कुशवाहा यांनी मांडला बंद साखर कारखान्यांचा प्रश्न

सलेमपूर : खासदार रविंद्र कुशवाहा यांनी पूर्वांचलमध्ये बंद पडलेल्या साखर कारखान्यांचा मुद्दा शुक्रवारी लोकसभेत उपस्थित केला.

भाजपचे खासदार कुशवाहा यांनी यापूर्वी संसदेत आपल्या मतदारसंघात सैनिक स्कूल आणि सिकंदरपूर येथे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याची मागणी केली होती. कुशवाहा यांनी बंद साखर कारखान्यांचा मुद्दा मांडताना सांगितले की, बसपच्या सरकारने आपल्या वैयक्तिक फायद्यासाठी सुमारे एक डझन साखर कारखाने कवडीमोल दराने विकले. सद्यस्थितीत प्रतापपूर साखर कारखाना सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यात आणखी एका अत्याधुनिक साखर कारखान्याची गरज आहे असे खासदार म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here