खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि कुटुंबीयांनी घेतली राष्ट्रपतींची भेट; साखर उद्योगावर चर्चा

फलटण: देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र, त्यासाठी प्रयत्न केले जातातच असे नाही. मात्र, खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या कन्या ताराराजे आणि इंदिराराजे यांनी थेट राष्ट्रपतींना ई – मेल पाठवून भेट घेण्याची इच्छा व्यक्त केली होती. राष्ट्रपतींनी याची दखल घेत आपल्या मुंबई दौऱ्याच्या दरम्यान भेटीस निमंत्रण दिले आणि ही भेटही झाली. यावेळी महाराष्ट्रातील साखर कारखाने, साखर उद्योग आणि या व्यवसायातील स्थितीबाबत खासदार नाईक-निबांळकर यांनी राष्ट्रपतींशी चर्चा केली.

या निमंत्रणानुसार, ताराराजे आणि इंद्राराजे यांनी आपले वडील आणि माढा लोकसभा मतदारसंघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सातारा जिल्हा परिषद सदस्या असलेल्या आई जिजामाला नाईक-निंबाळकर यांच्यासमवेत मुंबईत राष्ट्रपतींच्या दौऱ्यावेळी त्यांची भेट घेतली. मुंबईत राजभवनात ही भेट झाली. यावेळी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ताराराजे आणि इंदिराराजे यांच्यासोबत सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा क्षेत्राविषयी चर्चा केली. सातारा जिल्हा परिषदेच्या सदस्या अॅड. जिजामाला नाईक-निंबाळकर यांनी राष्ट्रपतींसोबत राज्यातील साखर उद्योग, साखर कारखाने, या व्यवसायाची स्थिती यांविषयी दीर्घ चर्चा केली. खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी महाराष्ट्रासह माढा लोकसभा मतदारसंघातील सद्यस्थिती, उपक्रमांविषयी राष्ट्रपतींना माहिती दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here