लखनौ : भारतीय जनता पक्षाचे खासदार वरुण गांधी यांनी पुन्हा उसाच्या दरवाढीचा मुद्दा उपस्थित केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना लिहिलेल्या पत्रात गांधी यांनी ऊस दर ४०० रुपये प्रती क्विंटल करण्याची मागणी केली आहे. भाजप खासदार गांधी यांनी ट्वीट करून मुख्यमंत्र्यांना आपले पत्र सादर केले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, उत्तर प्रदेशच्या आगामी गळीत हंगामासाठी ऊस दर ३५० रुपये आहे. योगीजी हा दर ३५० रुपये प्रती क्विंटल केल्याबाबत धन्यवाद. मी तुम्हाला विनंती करतो की कृपया वाढता खर्च आणि महागाई पाहता यावर फेरविचार करावा. आणि ४०० रुपये दर जाहीर करावा अथवा ५० रुपये प्रती क्विंटल बोनस द्यावा.
योगी आदित्यनाथ यांनी राज्य सरकारकडून ऊस खरेदी दरात २५ रुपये प्रती क्विंटल वाढीची घोषणा केल्यानंतर गांधी यांनी
ही मागणी केली आहे. योगी यांनी अलिकडेच ऊस दर २५ रुपये वाढवून ३५० रुपये प्रती क्विंटल केला आहे. याबाबत, पत्रात वरुण गांधी यांनी म्हटले आहे की, गेल्या चार वर्षात उसाच्या उत्पादन खर्चात खूप वाढ झाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दयनीय आहे. त्यांना योग्य दर मिळत नाही. ते कर्जात बुडाले आहेत. उत्तर प्रदेशात ऊस हेच मुख्य पिक आहे. या शेतीवर ५० लाख शेतकरी परिवार अवलंबून आहेत. लाखो मजुरांना यामधून रोजगार मिळतो. माझ्या पिलीभीत मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी गेल्या चार वर्षात ऊस, खरे, बियाणे, किटकनाशके, वीज, पाणी, डिझेल, मजूरी, वाहतूक हे खर्च वाढल्याचे सांगितले. त्यामुळे लाखो शेतकरी योगी आदित्यनाथ यांच्याकडे आशेने पाहात आहेत, की ते दरवाढ करतील. सलग दुसऱ्यांदा वरुण यांनी योगी यांना पत्र लिहिले. यापूर्वी सप्टेंबरच्या सुरुवातीला त्यांनी पत्र लिहून दरवाढीची मागणी केली होती.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link