बागपत : साखर कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्यासाठी बागपतचे खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी ऊस मंत्र्यांची भेट घेतली. शेतकऱ्यांच्या समस्यांची ऊस मंत्र्यांना माहिती देऊन खासदारांनी कारखान्याची गाळप क्षमता वाढवावी अशी मागणी केली.
अमर उजालामध्ये प्रकाशित वृत्तानुसार, राज्याचे ऊस मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांची भेट घेवून खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी सांगितले की, दीर्घ काळापासून बागपत साखर कारखान्याच्या क्षमता वाढीची मागणी केली जात आहे. कारखान्याची पुरेशी गाळप क्षमता नसल्याने शेतकऱ्यांना कमी किमतीत गुऱ्हाळघरांना ऊस विकावा लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. त्यांनी सांगितले की, कारखान्याची गाळप क्षमता २५,००० क्विंटल आहे. कारखान्याचे टिनशेड, भवन जिर्ण झाले आहे. कारखान्याची गाळप क्षमता लवकरात लवकर वाढवावी अशी मागणी त्यांनी केली. ऊस मंत्र्यांनी त्यांना लवकर क्षमता वाढीचे आश्वासन दिले.