अमरोहा: अमरोहा लोकसभा मतदारसंघात ऊस उत्पादक शेतकऱ्यांची संख्या खूप मोठी आहे. परिसरातील सिंभावली साखर कारखाना शेतकऱ्यांना ऊस बिले देत नसल्याने मोठ्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. आर्थिक वर्ष संपत आले असूनही अद्याप गेल्या वर्षातील पैसे शेतकऱ्यांना मिळाले नसल्याचा प्रश्न खासदार दानिश अली यांनी संसदेत उपस्थित केला.
सिंभावली साखर कारखाना तोट्यात नाही असे सांगून खासदार अली म्हणाले, कारखान्याकडे डिस्टिलरी आहे. कारखाना नवा डिस्टिलरी प्लान्ट सुरू करीत आहे. त्यावर शेतकऱ्यांचे ४०० रुपयांची थकबाकी आहे. सरकारने ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची गरज आहे असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांच्या हिताच्या मागण्या संसदेपासून सर्व स्तरावर मांडल्या जात आहेत असे त्यांनी सांगितले.