बागपत साखर कारखान्याची क्षमता वाढविण्यासाठी खासदारांनी पाठवले ऊस मंत्र्यांना पत्र

बागपत : खासदार डॉ. सत्यपाल सिंह यांनी ऊस विकास तथा साखर कारखाना मंत्री लक्ष्मी नारायण चौधरी यांना पत्र पाठवून बागपत साखर कारखान्याची क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे. कारखान्याची गाळप क्षमता कमी असल्याने शेतकऱ्यांच्या उसाचे वेळेवर गाळप होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागते. ही समस्या सोडविण्यासाठी कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याची गरज आहे.

त्यांनी ऊस मंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, बागपत साखर कारखान्याची स्थापना १९५८ मध्ये झाली आहे. हा कारखाना आता जीर्ण झाला आहे. कारखान्याची प्रती दिन गाळप क्षमता २५ हजार क्विंटल आहे. कारखाना जुना झाल्याने साखर कारखान्यातील टीन शेड, मशीनरी जीर्ण झाली आहे. त्यामुळे कारखान्याशी संलग्न २६ हजार शेतकऱ्यांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. गेल्या काही काळापासून कारखान्याच्या क्षमता वाढीसाठी प्रयत्न केले जात आहेत. त्यांनी ऊस विकास तसेच साखर उद्योग मंत्री लक्ष्मी नारायण यांनी शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यासाठी कारखान्याची क्षमता वाढविण्याची मागणी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here