कर्नाटक: MRN Groupचा ऊस गाळपात नवा राष्ट्रीय विक्रम

मुधोळ : MRN Group ऑफ कंपनीजच्या निरानी शुगर्स लिमिटेडने ऊस गाळप क्षमतेचा राष्ट्रीय उच्चांक प्रस्थापित करुन आणखी एक यशाची पायरी गाठली आहे. कर्नाटकमधील बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ तालुक्यातील युनिटने १०७ दिवसांत २० लाख मेट्रिक टनाहून अधिक ऊस गाळप करुन राष्ट्रीय उच्चांक निर्माण केला आहे. त्यामुळे हा कारखाना आता देशातील सर्वात कुशल कारखान्यांपैकी एक बनला आहे.

देशातील अग्रणी साखर निर्माता कंपनी निरानी शुगर्स लिमिटेडच्या नव्या उच्चांकाने पुन्हा एकदा एमआरएन समुह चर्चेत आला आहे. साखर उद्योगातील उच्च मानके, चांगली कार्यपद्धती, निष्पःक्ष व्यवसायातील परंपरा पूर्ण करण्यासाठी हा समुह ओळखला जातो. केवळ १०७ दिवसांत २९ लाख मेट्रिक टनापेक्षा अधिक ऊस गाळप करून, एमआरएन समुहाने भारतातील साखर उद्योगात नवा मानदंड प्रस्थापित केला आहे. हा पूर्ण देशातील सर्वाधिक ऊस गाळपाचा उच्चांक आहे. निरानी शुगर्स लिमिटेडने या ऊस गाळप हंगामापर्यंत २५ लाख मेट्रिक टनहून अधिक ऊस गाळप करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे. हे देशातील आजवरची सर्वाधिक ऊस गाळप ठरेल.

एमआरएन समुहाने यापूर्वी एक वर्ष आधी उच्चांकी ऊस गाळप क्षमतेपर्यंत पोहोचून विक्रम प्रस्थापित केला होता. समुहाने एका दिवसात ६०,९७५.९३८ मेट्रिक टन ऊस गाळप करुन नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. पूर्ण दक्षिण भारताता नोंदण्यात आलेला हा गाळपाचा सर्वोच्च विक्रम आहे. एमआरएन समुहाअंतर्गत येणाऱ्या सर्व युनिटनी यावर्षी आपली उच्च गाळप क्षमता गाठली आहे. एक प्रकारे देशातील सर्वात कुशल, सफल आणि विश्वासार्ह साखर कारखान्यांपैकी एक बनली आहे.

आपल्या कंपनीने नवा विक्रम प्रस्थापित केल्याबद्दल आनंद व्यक्त करताना एमआरएन समुहाचे व्यवस्थापकीय संचालक विजय निरानी यांनी या यशाचे श्रेय शेतकरी आणि कर्मचाऱ्यांना दिले. ते म्हणाले, आम्ही १.५ लाखांहून अधिक शेतकरी, आमच्या कर्मचाऱ्यांच्या योगदानातून हे यश मिळविण्यात यशस्वी झालो आहोत. आम्हाला या चालू ऊस गळीत हंगामाची चांगली समाप्ती करता येईल अशी अपेक्षा आहे.

निरानी समुहाकडून उच्च गुणवत्तेच्या साखरेचे उत्पादन करण्याबरोबरच साखर उद्योगात मोठी प्रगती करत आहे. साखर निर्मितीच्या जगतात समुहाने स्वतःची अशी खास ओळख निर्माण केली आहे. १९९५ मध्ये स्थापन झालेला MRN समूह कर्नाटकमधील सफल व्यावसायिक संस्थांचा समूह आहे. या उद्योग समुहाने साखर, इथेनॉल, कृषी उद्योग, सिमेंट, जैव इंधन, नवऊर्जा, बँकिंग, आरोग्य सेवा, शिक्षण अशा क्षेत्रांमध्ये व्यावसायिक हितांचे वैविध्य जपले आहे. समुहाने कर्नाटकमध्ये आशियातील सर्वात मोठ्या इथेनॉल उत्पादन युनिटची स्थापना केली आहे. एमआयएन समुहामध्ये ७०,००० हून अधिक लोकांना रोजगार मिळाला आहे. यामध्ये १.४ लाख हून अधिक शेतकरी कुटुंबे कायमस्वरुपी उपजिविका करण्यास सक्षम बनली आहेत.

एमआरएन समूहाची स्थापना उद्योग मंत्री मुरुगेश आर. निरानी यांनी केली होती. त्यांचा जन्म बागलकोट जिल्ह्यातील बिलगी तालुक्यातील बसवा हंचिनाळ गावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. हुबळीतील बीव्हीबी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग अँड टेक्नॉलॉजीमध्ये सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण आणि पुण्यात त्यांनी बिझनेस मॅनेजमेंटमध्ये पीजी डिप्लोमा केला. त्यानंतर निरानी यांनी नोकरी शोधण्याऐवजी स्वतःचा उद्योग उभारण्याचा निर्णय घेतला. ते आपल्या गावातील शेतकऱ्यांच्या दुर्दशेबाबत चिंतेत असायचे. त्यांच्यासाठी काहीतरी चांगले करावे असे त्यांचे प्रयत्न राहिले. आपल्या गावात ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्यानंतर त्यांनी शेतकऱ्यांची समस्या सोडविण्यासाठी, त्यांचे उत्पन्न वाढवणे आणि स्थानिक लोकांना रोजगार मिळावा या हेतून १९९५ मध्ये मुधोळमध्ये ५०० टीसीडी क्षमतेच्या ऊस गाळप युनिटची स्थापना करण्याचा निर्णय घेतला होता.

आज त्याच एमआरएन समुहाकडे सहा साखर कारखान्यांचे व्यवस्थापन आहे. यामध्ये निरानी शुगर्स लिमिटेड, श्री साई प्रिया शुगर्स लिमिटेड, एमआरएन केन पॉवर इंडिया लिमिटेड, केदारनाथ शुगर्स लिमिटेड आणि बादामी शुगर्स लिमिटेड यांचा समावेश आहे. यांची प्रतीदिन गाळप क्षमता ७०,००० टीसीडीहून अधिक आहे. उपलब्ध कच्च्या मालावरुन ऊसाच्या विविध १२ उपपदार्थांचे उत्पादन केले जात आहे. समुहाने साखरेच्या ६हून अधिक प्रकार आणि ग्रेडचे उत्पादन केले आहे.

आपला उद्योग यशस्वीपणे चालविल्यानंतर निरानी यांनी पद सोडण्याचा निर्णय घेतला. सार्वजनिक क्षेत्रात काम करता यावे आणि पक्ष तसेच सरकारी कामांसाठी अधिक वेळ देता यावा यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला. त्यांनी आपला मुलगा विजय निरानी यांना समुहाची सर्व जबाबदारी दिली आहे. आपल्या समुहाकडून ऊसाच्या गाळपामध्ये केलेल्या नव्या राष्ट्रीय उच्चांकामुळे उत्साहित एमआरएन समुहाचे संस्थापक, उद्योग मंत्री मुरुगेश आर. निरानी यांनी आपला मुलाचे, समुहाचे व्यवस्थापकीय संचालक विजय निरानी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. शेतकरी तसेच कर्मचाऱ्यांचे नव्या विक्रमाबाबत आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here