नवी दिल्ली: जगातील टॉप 10 श्रीमंतांच्या ताज्या लिस्टमध्ये भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी पाचव्या स्थानावर घसरुन सातव्या नंबरावर आले आहेत. शुक्रवारी ते पाचव्या स्थानावर होते. आज शेयर बाजारामध्ये रिलायंस इंडस्ट्रिज च्या शेअर्समध्ये जवळपास पाच टक्के घट दिसून आली. याचा परीणाम आरआईएल चे चेअरमन मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थ वरही झाला आहे. फोर्ब्स रियल टाइम बिलेनियर यांच्या लिस्टनुसार सोमवारी मुकेश अंबानी यांच्या नेटवर्थ मध्ये जवळपास 11 वाजेपर्यंत 3.7 अरब डॉलर कमी आली. आता त्यांची संपत्ती 74.6 अरब डॉलर राहिली आहे.
एशियातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांना एलन मस्क आणि वॉरेन बफेट यांनी मागे टाकले आहे. शुक्रवारी फेसबुक च्या शेअर्समध्ये मोठी घट झाल्यामुळे मार्क जुकरबर्ग यांच्या संपत्तीमध्येही घट झाली आहे, ते 96.7 अरब डॉलर सह चौथ्या स्थानावर कायम आहेत. पहिल्या स्थानावर अमेजन चे सीईओ जेफ बेजोस आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.