मुंबई : अनेक दिवसांनंतर मुंबईत पुन्हा दक्षिण-पश्चिम मान्सून पुन्हा सक्रीय झाला आहे. त्यामुळे शहर आणि परिसरात जोरदार पाऊस झाला. भूस्खलन झाल्याचे वृत्त आहे. रात्रभर पाऊस झाल्याने सखल भाग जलमय झाले आहेत.
आयएमडीने दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री नवी मुंबई, ठाणे आणि परिसरात २० ते ७० मिमी पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाने याआधीच मुंबईत मंगळवारी मध्यम ते तीव्र स्वरुपाचा पाऊस होण्याचा इशारा दिला होता. मुंबईच्या विभागीय हवामान केंद्राने आगामी २४ तासात शहर-उपनगरात मध्यम आणि काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे.
आयएमडीने ट्वीट केले आहे की, विदर्भाच्या पश्चिम भागात कमी दबावाच्या पट्ट्यामुळे मुंबई आणि उपनगरातील काही ठिकाणी पुढील २४ तास पाऊस सुरू राहील. अनेक ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. तर काही ठिकाणी जोरदार पाऊस पडू शकतो. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार पुढील तीन ते चार दिवसांत राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. राज्यात मुंबई, ठाणे, कोकणात हा पाऊस पडेल असे आयएमडीचे म्हणणे आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून रिमझीम पाऊस पडत आहे. मात्र, राज्यात आता जोरदार पाऊस होईल. दरम्यान छत्तीसगडमध्ये कमी दबावामुळे त्याचा प्रभाव महाराष्ट्रावर पडला आहे. मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्राच्या उत्तर विभागातही चांगला पाऊस होईल. एकूण १८ जिल्ह्यांत चांगला पाऊस होईल असे अनुमान हवामान विभागाने वर्तवले आहे.
चीनीमंडी चे अपडेट्स व्हाट्सअप वर मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा
WhatsApp Group Link