मुंबई : शहरात जोरात पसरत असलेल्या कोरोना वायरसमुळे तीन पोलिसांचा मृत्यू झाला. यानंतरची खबरदारी म्हणून मुंबई पोलिसांनी 55 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पोलीस कर्मचार्यांना कोव्हीड -१९ च्या पार्श्वभूमीवर घरीच राहण्याचे आदेश दिल्याचे, अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले.
यासंदर्भातील अधिकृत आदेश आज नंतर देण्यात येणार असताना, विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, मुंबई पोलिस आयुक्तांनी 55 वर्षांपेक्षा जास्त वयातील पोलिसांना घरीच राहण्यास सांगितले आहे. मुंबई पोलिसांच्या एका हेडकॉन्स्टेबलचा सोमवारी कोरोना वायरसमुळे मृत्यू झाला होता.
विशेष म्हणजे, महाराष्ट्र हे देशातील सर्वात जास्त कोरोनाबाधित राज्य असून एकूण 8,590 रुग्ण पॉझिटीव्ह असून 369 जणांचा यामुळे बळी गेला असल्याचे, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने मंगळवारी सांगितले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.