मुजफ्फरनगर : मोरना साखर कारखान्याच्या गोदामाचे कुलूप तोडून साखरेची 58 पोती चोरीला गेली आहेत. चोरीचे प्रकरण समजल्यानंतर लगेचच कारखान्याचे मुख्य व्यवस्थापक आणि संचालकांनी गोदामाचे निरिक्षण केले.
भोपा पोलीस ठाणे परिसरांतर्गत गंगा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामध्ये मंगळवारी सकाळी गोदामाचे कुलूप तोडल्याचे कामगारांच्या लक्षात आले. आजूबाजूला त्यांनी पाहिले की, कारखान्याच्या बाजूला असणार्या झाडीत साखरेची पोती पडली आहेत. हे कळाल्यानंतर मुख्य व्यवस्थापक एच वी कौशिक, नरेंद्र कुमार, मुशर्रफ अली आणि संचालक मंडळाच्या मनोज राठी, राजीव, वेदवीर, हवा सिंह, ररुल कुमार आदी जागेवर पोचले.
मुख्य व्यवस्थापकांनी एक टीमकडून गोदामातील साखर साठ्याची तपासणी केली, तेव्हा गोदामात 58 पोती कमी होती. याबाबत सहायक अभियंता नरेंद्र कुमार यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. प्रभारी निरीक्षक एम.एस. गिल यांनी सांगितले की, गुन्हा नोंद करुन कारवाई केली जाईल.