मुझफ्फरनगर : जिल्ह्यातील गुळ उत्पादनाची ओळख जगभरात आहे. मुझफ्फरनगरने गुळ उत्पादनात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, यावेळी उसाचे उत्पादन घटल्याने गुळाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. गुळ बाजारातील सात शितगृहात यावेळी ५७ हजार गुळरव्यांचा साठा कमी झाला आहे. यंदा येथे ११ लाख ७३ हजार गुळरव्यांचा साठा झाला आहे.
जिल्ह्यात यावेळी उसाचे लागवड क्षेत्र वाढल्यानंतरही उत्पादन घटले आहे. साखर कारखान्यांना एक कोटी क्विंटल उसाचा पुरवठा कमी झाला आहे. अशाच पद्धतीने गुळाच्या उत्पादनावरही परिणाम झाला आहे. आठ मे २०२३ रोजी शितगृहात १२ लाख ३० हजार १०५ गुळ रवे होते. यावर्षी आठ मेअखेर केवळ ११ लाख ७३ हजार ४५ गुळ रव्यांचा साठा झाला आहे. यावेळी जिल्ह्यात साखर आणि गुळ दोन्हींचे उत्पादन घटले आहे.
गुळ बाजार असोसिएशनचे अध्यक्ष संजय मित्तल तथा मंत्री श्याम सिंह सैनी यांच्या म्हणण्यानुसार, यावेळी एप्रिलच्या अखेरपर्यंत ९० टक्के गुऱ्हाळे बंद झाली होती. बहुतांश साखर कारखानेही एप्रिल महिन्यातच बंद झाले. जिल्ह्यात एखाद-दुसरे गुऱ्हाळ सुरू आहे. त्यामुळे हंगामाच्या अखेरीस पुरवठा अत्यंत कमी झाला आहे.