मंड्या : भाजप सरकार मंड्या जिल्ह्याच्या विकासासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी सांगितले, ते म्हणाले की, नव्या दोन लिफ्ट इरिगेशन योजना सुरू करण्यात येतील. यापैकी एक बुकनकेरेमध्ये २६५ कोटी रुपये खर्चून असेल तर दुसरी संथेबचहल्लीमध्ये २१२ कोटी रुपये खर्चून सुरु केली जाईल. बोम्मई यांनी सांगितले की, मायशुगर कारखाना ऑगस्ट महिन्यात कामकाज सुरू करेल, असे बोम्मई यांनी सांगितले. याबाबत सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. सरकारने मंड्या येथील कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी निधी दिला आहे आणि पुढील महिन्यात या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या उसापासून गाळप सुरू होईल.
ते म्हणाले की, केआर पेट तालुक्यातील ११ तलावांसाठी जवळपास २५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. बोम्मई यांनी सांगितले की, के. आर. पे जलजीवन मिशनअंतर्गत तालुक्यातील प्रत्येक घरात पिण्याचे पाणी पुरवठा करण्यासाठी तालुक्याला जवळपास ४२० कोटी रुपये दिले जातील. या मिशन अंतर्गत निवडलेल्या तीन तालुक्यांमध्ये के. आर. पेटला सर्वाधिक मदत दिली जात आहे. मंड्यामधील सिंचनाच्या धरणांच्या आधुनिकीकरणाचा उल्लेख करताना ते म्हणाले की, कावेरी आणि हेमावती नद्यांतून पाणी घेणाऱ्या धरणांचे प्राधान्याने आधुनिकीकरण केले जाईल. हेमवती आणि वाम तटावरील धरणाच्या आधुनिकीकरणाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. बोम्मई यांनी सांगितले की, त्यांचे सरकार शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहे.
यावेळी माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा, सिंचन मंत्री गोविंद करजोल, मंड्याचे जिल्हा प्रभारी के. गोपालय्या, रेशन उत्पादन व क्रीडा मंत्री के. सी. नारायण गौडा, महसूल मंत्री आर. अशोक, समाज कल्याण मंत्री श्रीनिवास पुजारी आदी उपस्थित होते.