मायशुगर साखर कारखाना पुन्हा सुरू होणार : मंत्री पाटील

मंड्या : २०१९-२० या हंगामापासून बंद पडलेला मायशुगर साखर कारखाना पुन्हा सुरू होणार आहे. मायशुगर साखर कारखान्याचा पाहणी दौरा करून प्रसार माध्यमांशी बोलताना साखर आणि वस्त्रोद्योग मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, सरकार एक शतकांपूर्वीचा असलेला साखर कारखाना पुन्हा एकदा सुरू करण्यासाठी सर्व प्रयत्न करीत आहे. हा कारखाना मंड्या येथील लोकांचे गौरव आहे. कारखाना सुरू व्हावा यासाठी तांत्रिक आणि आर्थिक समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. कारखाना कोणत्याही परिस्थितीत सुरू केला जाईल यात शंका नाही असे मुनेनकोप्पा यांनी सांगितले.

मंत्री पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले की, सरकारने आता स्वतःच्या अखत्यारीत असलेल्या सर्व कारखान्यांच्या पुनरुज्जीवनासाठी प्रयत्न चालवले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार कारखाना पुन्हा सुरू करण्यात कोणतेही अडथळे निर्माण होऊ नयेत यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. सरकारने यंत्रसामग्रीची दुरुस्ती, देखभाल आणि पुनरुज्जीवनासाठी निधीची तरतूद करण्याबाबत योग्य ती काळजी घेतली आहे.

यावेळी खासदार सुमलता अंबरीश, आमदार डॉ. के अन्नादानी, एम. श्रीनिवास आणि डी. सी. थमन्ना, आमदार दिनेश गुलीगौडा, मंड्याचे उपायुक्त एस. अश्वथी, सहायक आयुक्त शिवानंद मूर्ती, माहिती अधिकारी टी. के. हरीश, माय शुगरचे अध्यक्ष शिवलिंगगौडा यांसह शेतकरी नेते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here