म्हैसूर : राज्य सरकारकडून चालवला जाणारा मायशुगर साखर कारखाना १० सप्टेंबरपूर्वी गाळप सुरू करेल, असे साखर मंत्री शंकर पाटील मुनेनकोप्पा यांनी सांगितले. मंत्री मुनेनकोप्पा यांनी रविवारी साखर कारखान्याचा दौरा केला. विविध उपकरणे आणि मशीनरीची पाहणी केली. ते म्हणाले की, एका तज्ज्ञ समितीच्या शिफारसी स्वीकारून साखर कारखाना पु्न्हा बंद पडू नये यासाठी आवश्यक ती सर्व पावले उचलण्यात आली आहेत. तज्ज्ञ समितीने तांत्रिक आणि आर्थिक शिफारसी करून पैशांचा अपव्यय रोखण्यासाठीच्या आवश्यक त्या उपाय योजनांची ओळख पटवली आहे. तज्ज्ञ समितीच्या शिफारशींमुळे साखर कारखाना कोणत्याही नुकसानीशिवाय चालविण्याचा मार्ग स्वीकारला जाईल. राज्य सरकार ऊसाचे गाळप सुरू केल्यानंतर इथेनॉल उत्पादन सुरू करणार आहे.
मंत्री म्हणाले की, सरकार व्यवस्थापन खर्चासाठी आवश्यक त्या निधीची उपलब्ध करेल. तरच गाळप हंगाम योग्यरित्या कार्यरत राहील. माय शुगर साखर कारखाना हे कर्नाटकच्या लोकांचे गौरवस्थान आहे. साखर कारखाना योग्य पद्धतीने सुरू राहावा असे प्रयत्न सरकारचे आहेत. सरकारी व्यवस्थापनांतर्गत कारखाना चालविण्यासाठी अधिकारी नियुक्त केले जातील. आणि कोणत्याही कायद्याचे उल्लंघन होवू नये यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. या वेळी मायशुगर कारखान्याचे महा व्यवस्थापक शिवानंद मूर्ती आणि कार्यकारी संचालक अप्पासाहेब पाटील उपस्थित होते.