जसपूर : नादेही साखर कारखान्याने १० जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले आहे. उसाचे सहा कोटी रुपये बँकांमध्ये पाठविण्यात आले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
साखर कारखान्याचा या गळीत हंगाम २५ नोव्हेंबर रोजी सुरू झाला. ३१ डिसेंबरपर्यंत गाळप केलेल्या उसापोटी १९ कोटी रुपये कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. आता दुसऱ्यांदा १० जानेवारीपर्यंत खरेदी केलेल्या उसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर पाठविण्यात आले आहेत. कारखान्याचे व्यवस्थापक सी. एस. इमलाल यांनी सांगितले की, साखर कारखान्याने आतापर्यंत १५ लाख क्विंटल उसाचे गाळप केले आहे. सुमारे एक लाख ६१ हजार ६०९ क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कारखान्याचा एकूण साखर उतारा १०.५१ टक्के असून आजचा उतारा ११.३६ टक्के आहे. उसाचा दर जाहीर झाला नसल्याने गेल्यावर्षीच्या दरानुसार ३२७ रुपये क्विंटलप्रमाणे शेतकऱ्यांना पैसे देण्यास आले आहेत. शेतकऱ्यांनी चांगल्या प्रतिचा ऊस कारखान्याकडे पाठवावा असे आवाहन करण्यात आले आहे. कारखान्याच्या परिसरात अधिक चांगले उत्पादन देणाऱ्या जातींची लागवड करण्याचे आवाहनही कारखाना प्रशासनाने केले आहे.
शेतकऱ्यांना दिलासा
सध्या शेतकरी आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत. अशाचत कारखान्याच्यावतीने ऊस बिले अदा झाल्याने दिलासा मिळाला आहे. शेतकऱ्यांनी सांगितले की, आंदोलनामुळे त्यांची कामे रखडली आहेत. अन्य पिकांचे पैसे हळूहळू येत आहेत. अशातच ऊसाचे पैसे मिळाल्याने रेंगाळलेली कामे सुरू होतील.