नादेही साखर कारखाना करणार ऑक्टोबरमध्ये गाळप

काशीपूर : कारखान्यात साखरेचे अधिक उत्पादन मिळावे यासाठी ऑक्टोबर महिन्यात कारखाने सुरू करण्यात येणार आहेत. नादेही साखर कारखान्याच्या सरव्यवस्थापकांनी यासाठी कंबर कसली आहे. १५ ऑक्टोबरपर्यंत कारखाना सुरू व्हावा असे प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले. या अनुषंगाने सर्व तयारी केली जात आहे. बिजनौर जिल्ह्यात अफजलगढ, धामपूर आणि मुरादाबादमधील ठाकूरद्वारा आदी विभागातील कारखाने ऑक्टोबरमध्येच सुरू होतात. हे कारखाने उत्तर प्रदेशच्या सीमेलगत आहेत.

लाईव्ह हिंदूस्थानमध्ये प्रकाशीत वृत्तानुसार, हे कारखाने लवकर सुरू होत असल्याने शेतकरी आपला ऊस तिकडे घेऊन जातात. मात्र, यंदा या भागातील ऊस बाहेर जावू नये यासाठी सर व्यवस्थापक विवेक प्रकाश यांनी कारखाना लवकर सुरू करण्याची तयारी सुरू केली आहे. विभागातील ऊस इतर कारखाने तसेच गुऱ्हाळांसाठी पाठवला जातो. त्यातून शेतकऱ्यांना अडचणी येतात. याशिवाय, कारखाना उशीरा सुरू झाल्यास गाळपाची उद्दीष्टपूर्तीही होत नाही. त्यामुळे यंदा कारखाना ऑक्टोबरमध्ये सुरू केला जाईल, असे सरव्यवस्थापकांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here